रविवार, ३१ मार्च, २०१३

२००८-०९चे पुरस्कार

चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे २००८-०९ साठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे    पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. पुरस... thumbnail 1 summary

चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे २००८-०९ साठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे 
 
पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. पुरस्काराचे वितरण १ ऑगस्टला श्रमिक पत्रकार भवनात होणाऱ्या समारंभात करण्यात आले. ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पध्रेत प्रथम पुरस्कार ‘हितवाद’चे वरोरा येथील वार्ताहर प्रशांत खुळे यांना, व्दितीय पुरस्कार ‘लोकसत्ता’चे वरोरा येथील वार्ताहर विलास टिपले यांना तर तृतीय पुरस्काराचे मानकरी ‘भास्कर’चे वरोरा येथील वार्ताहर मनीष चंडालिया ठरले आहेत. ‘सकाळ’चे राजुरा येथील वार्ताहर प्रशांत कुंभारे, ‘लोकमत’चे भद्रावती येथील वार्ताहर सचिन सरपटवार व ‘सकाळ’चे वडसा येथील वार्ताहर विष्णू वैरागडे यांना प्रश्नेत्साहनपर पुरस्कार जाहीर झाले.
यंदाचा शुभवार्ता पुरस्कार ‘देशोन्नती’चे चंद्रपूर प्रतिनिधी राजू येरणे यांना जाहीर झाला आहे. मानवी अभिरूची वृत्तकथा पुरस्काराचे यंदाचे मानकरी ‘लोकमत’चे सिरोंचा प्रतिनिधी आनंद मांडवे ठरले आहेत. वृत्तछायाचित्र स्पध्रेचा यंदाचा पुरस्कार ‘सकाळ’चे शशिकांत आक्केवार (चंद्रपूर) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व टाइम्स ऑफ इंडियाचे राजकीय संपादक प्रफुल्ल मारपकवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष देवेंद्र गावंडे राहतील. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकारांसाठी आयोजित ग्रामीण व शुभ वार्ता पुरस्कार स्पर्धा दिवंगत छगनलाल खजांची स्मृतिप्रीत्यर्थ, मानवी अभिरूची वृत्तकथा लोकसेवा व विकास प्रतिष्ठानतर्फे तर वृत्तछायाचित्र स्पर्धा इतिहासाचे अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येते. स्पध्रेचे परीक्षक म्हणून प्रश्न. इसादास भडके, संजय रामगिरवार व आशिष देव यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक म्हणून पंकज शर्मा, मंगेश खाटिक व देवनाथ गंडाटे यांनी काम केले.

Sponsor

test