पुरस्कार

चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात  वितरण सोहळा - एक ऑगस्ट कर्मवीर पुरस्कार -  पत्रकारित... thumbnail 1 summary
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात 

वितरण सोहळा - एक ऑगस्ट

कर्मवीर पुरस्कार - 
पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणा-या जिल्ह्यातील दोन पत्रकारांना पत्रकार संघाच्या 
वतीने दरवर्षी कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात येते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख राशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (या पुरस्काराची निवड कार्यकारिणी करीत असते)

इत्तर पुरस्कार नावे -  
ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा आणि वृत्तछायाचित्र स्पर्धा 
१५ जुलैपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतात. 

नियम - 
पुरस्कारासाठी एक एप्रिल ते ३१ मार्च या एक कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येतात. 

अटी - 
लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरित नसावे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मुळ प्रतीसह चार छायांकित प्रतीत असावे. मुळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा.

* स्व. छगनलाल खजांची स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार 
स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. 
स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे
रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

* शुभवार्ता पुरस्कार 
केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र

* मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कार
लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठा तर्फे प्रायोजित 
पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील. 

हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धा
इतिहास अभ्यासक अशोकसह ठाकूर प्रायोजित
ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख एक हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


----------------------------------------
यापूर्वी दोनदा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांनी त्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवू नये. सर्व प्रवेशिका १५ जुलै पर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब जुना वरोरा नाका चंद्रपूर या पत्यावर पाठवाव्या, 

Sponsor

test