बुधवार, २४ जुलै, २०१३

धर्माधिकारी, पोफळी यांना कर्मवीर पुरस्कार

  चंद्रपूर, : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या कर्मवीर पुरस्काराची घोषणा झाली असून, यंदा ज्येष्ठ ... thumbnail 1 summary
 

चंद्रपूर, : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या कर्मवीर पुरस्काराची घोषणा झाली असून, यंदा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी आणि शशिकांत धर्माधिकारी हे या पुरस्काराचे मानकरी ठरले.
पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणा-या जिल्ह्यातील दोन पत्रकारांना पत्रकार संघाcha vatine दरवर्षी कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात येते. एक ऑगस्ट रोजी पत्रकार भवनात होणा-या समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख राशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे मानकरी शशिकांत धर्माधिकारी हे मूल येथील महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य असून, त्यांनी मतरुण भारतमध्ये वार्ताहर म्हणून काम केले आहे. पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. राजाभाऊ पोफळी यांनी विविध वृत्तपत्रात वार्ताहर, उपसंपादक आणि सहायक संपादक म्हणून काम केले.पत्रकार, कामगार आणि ग्राहक चळवळीत त्यांनी योगदान दिले आहे. श्रमिक पत्रकार भवनाच्या स्वतंत्र भवनासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांचा बालकथा संग्रह प्रकाशित असून, त्याला पुरस्कार मिळालेला आहे.

Sponsor

test