रविवार, ३१ मार्च, २०१३

आमदार सुधीर मुनगंटीवारची मीट द प्रेस

गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणार - मुनगंटीवार चंद्रपूर - पक्षबांधणी, संघटनेची बळकटीकरण आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी नेतृत्वशाली का... thumbnail 1 summary

गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणार - मुनगंटीवार
चंद्रपूर - पक्षबांधणी, संघटनेची बळकटीकरण आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी नेतृत्वशाली कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज (ता. 11) आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुनगंटीवार यांचे पहिल्यांदा चंद्रपुरात आगमन झाले. पक्षाची धुरा स्वीकारल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षांसोबत बातचीत करण्यासाठी पत्रकार संघाच्या कार्यालयात त्यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सरचिटणीस संजय तुमराम यांनी प्रास्ताविक केल्यानंतर श्री. हुनगुंद यांनी पत्रकार संघाची भूमिका विशद केली. यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या संदर्भ वाचनालयात नवी पुस्तकांसाठी मदत आणि पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली.

यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, पत्रकार संघाच्या संदर्भ वाचनालयात नवी पुस्तकांसाठी आणि पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करेन, असे आश्‍वासन दिले. राज्याचा कारभार सांभाळताना विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी नियोजन केले असून, या पदामुळे जिल्ह्याचा विकास नक्कीच होईल, असा विश्‍वास दिला.

सक्षम कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी एक मेपासून संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. राज्याची सात विभागात विभागणी करण्यात आली असून, 10 जूनपासून जिल्हा संघटन कार्यक्रम होईल. जुलै आणि ऑगस्टमध्ये 355 तालुक्‍यांत अभियान राबविण्यात येणार आहे

Sponsor

test