रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा थाटात

जागतिकीकरणाने वर्तमानपत्राचा चेहरा बदलला जेष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांचे मत चंद्रपूर : ज्या वृत्तपत्राकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म... thumbnail 1 summary
जागतिकीकरणाने वर्तमानपत्राचा चेहरा बदलला
जेष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांचे मत
चंद्रपूर : ज्या वृत्तपत्राकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितला जातोय, हे वृत्तपत्र दिवसेंदिवस बदलत चालले. आजच्या वृत्तपत्रावर जागतिकीकरणाच्या प्रभाव दिसुन येत असून, जागतिकीकरणा मूळे वृत्तपत्राचा चेहराच बदलत चाललाय, असे परखड मत जेष्ठ महिला पत्रकार आणि दैनिक पुण्यनगरीच्या पुणे आवृत्ती संपादक राही भिडे यांनी व्यक्त केले. चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक  पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत कर्मविर पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दोन जेष्ठ पत्रकारांना कर्मविर पुरस्कार तसेच अन्य पत्रकारांसाठी विविध पुरस्कार स्पर्धेेचे आयोजन करण्यात येते. या पुरस्कार स्पर्धेचे वितरण श्रमिक  पत्रकार संघाच्या सभागृहात शुक्रवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर होते. यावेळी व्यासपिठावर राही भिडे यांच्यासह चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक राजीव जैन, पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक, सत्कारमृर्ती जेष्ठ पत्रकार प्रकाश शर्मा, किसनराव बोंडे गुरूजी आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

























Sponsor

test