रविवार, ३१ मार्च, २०१३

2010 चा कर्मवीर पुरस्कार

चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा2010 चा  कर्मवीर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नाईक व संपादक नंदा नागापु... thumbnail 1 summary
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा2010 चा  कर्मवीर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नाईक व संपादक नंदा नागापुरे यांना देऊन गौरवण्यात आला. शुभवार्ता  पुरस्कार प्रशांत देसाई व मानवी अभिरुची पुरस्कार संदीप रायपुरे यांना जाहीर झाला.
 पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा दरवर्षी कर्मवीर पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नाईक व साप्ताहिक ‘नवा संघर्ष’च्या संपादक नंदा नागापुरे यांची निवड करण्यात आली. २१०० रुपये दोन, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाईक यांनी नागपूर पत्रिका, युगधर्म या वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून काम केले. गेल्या ३२ वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत. नंदा नागापुरे या महिला पत्रकार असून ३२ वर्षांपासून त्यांचे या क्षेत्रात योगदान देत आहेत. 

Sponsor

test