शनिवार, २३ जुलै, २०१६

किशोर पोतनवार आणि ग. म. शेख यांना कर्मवीर पुरस्कार घोषित

किशोर पोतनवार आणि ग. म. शेख यांना कर्मवीर पुरस्कार घोषित चंद्रपूर दि. २५ जुलै : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया ... thumbnail 1 summary
किशोर पोतनवार आणि ग. म. शेख
यांना कर्मवीर पुरस्कार घोषित

चंद्रपूर दि. २५ जुलै : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया कर्मवीर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षी चंद्रपूरातील जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार आणि वरोरा येथील ज्येष्ठ पत्रकार ग. म. शेख उर्फ शेख गुरूजी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
    पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिलेल्या दोन ज्येष्ठ पत्रकारांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा कर्मवीर पुरस्कार दरवर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मान राशी असे या पुरस्काराचे स्वरूप असते. सोमवार दि. १ ऑगस्ट २०१६ रोजी आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
    कर्मवीर पुरस्काराचे यंदाचे मानकरी किशोर पोतनवार ४० ते ४५ गेल्या वर्षापासून पत्रकारिता करीत आहेत. गोंडवाना, गर्जना, हाक या वृत्रपत्रात त्यांनी काम केले असून ‘विलक्षण सत्यङ्क या साप्तहिकाचे संपादक आहेत. शिवाय राजकीय आणि सामाजिक चळवळीशी त्यांचा संबंध राहिला आहे.
    ग. म. शेख उर्फ शेख गुरूजी यांनी दै. महासागर, दै. चंद्रधून, दै. जनसामर्थ, दै. चंद्रपूर समाचार या दैनिकात वरोरा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सध्या ते चंद्रधून व चंद्रपूर समाचारचे वरोरा प्रतिनिधी म्हणून काम पहात आहे. जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक नोकरीला होते. सध्या ते सेवानिवृत्त आहे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले आहेत.

Sponsor

test